लघु सामायिक पाठ ( मराठी )
नमोस्तु सिद्धास ऋषीगणांस । त्रिकाल जे वंद्य तिन्ही जगास ।।
जेणे मनाला स्थिरता रहाते । करीन सामायिक शांतचित्ते ।।१।।
संपूर्ण जीवांवर साम्यभाव । धरीन वा संयम शांतभाव ।
मी आर्त रौद्र प्रकृती त्यजीन । त्रिकाल सामायिक आचरीन ।।२।।
सर्वांवरी मी समता धरीन । कुणावरी वैर न मी करीन ।
आशा महपाश झनीं त्यजीन । होईन मी नित्य समाधिलीन ।।३।।
जे जीव रागादीविकारभावें । मी हाय रे ! दुखविलें असावें ।।
ते सर्व माझ्यावरती क्षमोत । क्षमीन मी त्यांसहि एकचित्त ।।४।।
मनोवच:कायकृतानुमोदें । रत्नत्रयीं दोष घडे प्रमादे ।।
ते दोष मी आज मुखे वदून ।निंदा नि गर्हा करुनि त्यजीन ।।५।।
तिर्यंच वा मानव, देव यांची । पीडा जहाली तरि ही मनाची ।।
एकाग्रता निश्चल मी धरीन । कषाय, आहार , तनू त्यजीन ।।६।।
अनेक रागादि विकार भाव । प्रहर्ष, औत्सुक्य , भय प्रभाव ।।
दीनत्व मात्सर्य , विकार किंवा । सोडून देतों अरती रती वा ।।७।।
मृत्यू जरा , जन्म सदा जगात । यांची कधी भीति नसो मनातं ।।
मी लाभ हानी सुख दुःख यांस । समान लेखीन विषामृतास ।।८।।
दृगण्यान -चारित्र्य - तप:स्वरूप । आत्मा तथा संवर योगरूप ।।
आनंदरूपात्मक निर्विकल्प । आत्मा असे हा परमात्मरूप ।।९।।
आत्मा सदा शाश्वत एकरूप । याहून तें शेष अनेकरूप ।।
वियोग संयोग विभावरूप । जीवास नाना करिती विकल्प ।।१०।।
संयोगसंबंध असे जीवाला । म्हणून दुःखे असती तयाला ।।
संयोगसंबंध म्हणून आतां । सोडून देतो समतेकरितां ।।११।।
एवंच सामायिक हें अखंड । चालू असो यांत असो ना खंड ।।
मुक्ती-वधूला वशचूर्ण होवो । हे नित्य सामायिक शांति देवो ।।१२।।
इष्ट प्रार्थना
शास्त्राभ्यास जिनेंद्र-संस्तव सदा आर्यांसवें संगती ।
साधूंचे गुण-गान दोषकथनीं अत्यंत मुकस्थिती ।
सर्वांशी हित मिष्ट भाषण असो आत्म्यामधे भावना ।
जन्मोजन्मी असे निरंतर घडो जों मुक्तीची साधना ।।१३।।
तव पदयुग मम मानसीं मम मानस तव पदद्वयीं लीन ।
राहो जिनेंद्र तोंवरि होईल संप्राप्त मुक्तिचे सदन ।।१४।।
अक्षरपदार्थांहीं मात्राहीं हीन हें असे कवन ।
भगवती देवी मजला क्षमा करो तेंवि दु:खपरिहरण ।।१५।।

ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाCan you please also add marathi brihat samayik path?
Jai Jinendra.
I will try
हटवा