"मी मंत्र जपणार "
मी मंत्र जपणार, महावीर होणार ॥
सिंहाचा मम आत्मा छावा
विसरुनि गेला रुपा भावा
कर्माच्या कळपात रहावा
मी सिंह बनणार , महावीर होणार ॥ मी मंत्र ॥1।।
जननमरण-चक्करात पोहुनी
दमला आत्मा त्रास सोसुनी
विश्रांतिस्तव बसला टपुनी
मी ठाव घेणार ,महावीर होणार ॥मी मंत्र ॥ 2।।
जिनेश्वरांनी जिना लाविला
मोक्षाप्रत तो जाऊनि भिडला
रत्नाच्या पायऱ्या तयाला
मी चढुन जाणार ,महावीर होणार ॥मी मंत्र ॥3।।
अखंड शांती जिथे नांदते
पीडा- कसली मुळि न बाधते
तुच्छ- स्वर्गिचे सुख ज्यापुढते ,
मी साध्य तया करणार,महाविर होणार ॥मी मंत्र जपणार,महाविर होणार ॥4।।

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा