चोवीस तीर्थांकर लांछने
वर्तमान चोवीस जिनांचे लांछन चोवीस ।
भव्य जनांना नित्य स्मराया केले कवनास ।।१।।
वृषभ जिनाला बैल शोभतो, हत्ती अजितास ।
संभवनाथा घोडा, वानर अभिनंदन प्रभुस ।।२।।
सुमति जीनेंद्रा चकवा पक्षी , पद्म पद्मप्रभुला ।
देव सुपार्श्व स्वस्तिक साजे , चंद्र चंद्रप्रभूला ।।३।।
पुष्पदंत पदिं मगर विराजे , शीतल श्रीवृक्ष ।
श्रेयांसाते गेंडा चिन्ह ते , वासुपूज्य महिष ।।४।।
विमल जिनाचे सुकर लांछन , अनंत सायाळ ।
वज्र चिन्ह ते धर्मजिनाचे , शांती हरीण बाळ ।।५।।
कुंथूनाथा बकरा शोभे , अरहनाथ मीन ।
मल्लि कुम्भ , मुनिसुव्रत कासव , नमिस नीलकमल ।।६।।
नेमीजीनातें शंख शोभते , पार्श्वा सर्पफणा ।
नमस्कार त्या वीर प्रभूच्या सिंहांकित चरणा ।।७।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा